gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात सी.एम.एस.आय.टी. सर्व्हिसेसचे २३ व २४ जानेवारी रोजी कॅम्पस इंटरव्ह्यू

गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये प्लेसमेंट सेल आणि मुंबईस्थित सी.एम.एस.आय.टी. सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने कॉम्पुटर सायन्स आणि आय.टी. विभागातील विद्यार्थ्यांकरिता कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन महाविद्यालयात दि. २३ आणि २४ जानेवारी २०१८ रोजी करण्यात आले आहे. सी.एम.एस.तर्फे ट्रेनी इंजिनिअर या पदांकरिता मुलाखती घेण्यात येणार आहेत. तृतीय वर्ष विज्ञान करिता २०१७-१८ या वर्षी असलेले, कॉम्पुटर सायन्स आणि आय.टी. तसेच एम.एस्सी.: भाग-२ कॉम्पुटर सायन्सचे विद्यार्थी या मुलाखतीकरिता उपस्थित राहू शकतात. गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉल, मुख्य इमारत या ठिकाणी सदर मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांनी सकाळी ०९.०० वाजता मूळ प्रमाणपत्रांसह उपस्थित राहावे. अधिक माहितीकरिता प्लेसमेंट सेलचे प्रा. रुपेश सावंत आणि डॉ. उमेश संकपाळ यांच्याशी संपर्क साधावा. उपलब्ध संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)