gogate-college
Library

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘महात्मा गांधीजीच्या १५० व्या जयंतीनिमित्त ग्रंथप्रदर्शन’

सोमवार दिनांक १ ऑक्टोबर २०१८ रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त ग्रंथप्रदर्शन आयोजित केलेले आहे. ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थीवर्ग तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर उपस्थीत होते. उद्घाटन प्रसंगी ग्रंथपाल किरण धांडोरे यांनी प्रमुख पाहुण्याचे स्वागत केले. मनोगत व्यक्त करताना कार्याध्यक्ष श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी ”महात्मा गांधींजी सामान्यातील सामान्य लोकांपर्यत पोहचले होते. त्यामुळे स्वतंत्रलढ्यात सर्वात जास्त पाठींबा सर्वसामान्य लोकांचा मिळाला. म्हणूनच देशाच्या स्वतंत्रलढ्यात महात्मा गांधीचे नाव अग्रक्रमाने कायमच घेतले जाते” असे मनोगत व्यक्त केले.

प्राचार्यांनी व ग्रंथपालानी आलेल्या प्रमुख पाहुण्यांना ग्रंथालयाची ओळख करून दिली कै. बाबुराव जोशी हे कोकणातील नावाजलेले सर्वात मोठे महाविद्यालय ग्रंथालय असून या ग्रंथालायात १,१२,१४६ पुस्तके, १४१ नियतकालिके, ७८ दुर्मिळ हस्तलिखिते तसेच ७००० इ जर्नल्स व १,४०,००० इ पुस्तके ग्रंथालयात आहेत. तसेच विविध अभ्यासक्रमातील सिडी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. याचा वापर विद्यार्थी आणि इतर वाचक नित्यनियमाने करत असतात.

Comments are closed.
 
  • 2019 (36)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)