gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालाच्या बावडेकर व्याख्यानमाला; पर्यावरण तज्ज्ञ डॉ. दिपक आपटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन

Dr. Deepak Apteगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बावडेकर व्याख्यान मालेचे २९वे पुष्प आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पर्यावरण तज्ज्ञ डॉ. दिपक आपटे गुंफणार आहेत. महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात सोमवार दि. २७ फेब्रुवारी २०१७ रोजी सायंकाळी ०३.३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘२१ व्या शतकातील संवर्धनाची आव्हाने’ असा त्यांच्या व्याखानाचा विषय असून महाविद्यालयाच्या बावडेकर व्याख्यान मालेचे हे २९वे वर्ष आहे.

डॉ. दिपक आपटे हे निसर्ग आणि त्याची विविधता यांचे नाते शोधण्याचा प्रयत्न करणारे प्रसिद्ध संशोधक आहेत. त्यांचे पर्यावरणाविषयी आकर्षण वाखाणण्याजोगे आहे आणि ते पर्यावरणविषयक अनेक संस्थांवर कार्यरत आहेत. तसेच पर्यावरणासंबधी अनेक बाबींची भारत सरकारसाठी देखरेख करतात.

सध्या ते बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत. पर्यावरण विज्ञान, वातावरण बदलाचा हिमालयावर होणारा परिणाम, जैवविविधता परीक्षण, जमीन व पाणी यांचे पर्यावरणशास्त्र, तेल तवंगगाचा खारफुटी आणि त्याच्या परिसरातील जीवावर होणारा परिणाम यावर काम करतात. त्यांच्या संशोधन कार्यात चौदा संशोधन प्रकल्प, ५२ शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिध्द झाले आहेत. तसेच आतापर्यंत पाच पुस्तके त्यांनी लिहिली असून ते पीएच.डी.चे मार्गदर्शक आहेत. विविध देशांतून ते पर्यावरणविषयक सेमिनार आणि कॉन्फरन्सकरिता जात असतात. वन्य प्राण्यांचे छायाचित्रण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. समुद्रतळातील जैवविविधता विद्यार्थांना दाखवणे यात ते समरस होऊन काम करत आहेत.

या व्याख्यानाकरिता रत्नागिरी शहरातील पर्यावरण प्रेमी तसेच नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)