gogate-college

खगोल अभ्यास कार्यशाळेचे आयोजन

astronomy-workshop

गोगटे जोगळेकर महविद्यालयात
ख्यातनाम खगोल अभ्यासक प्रा. हेमंत मोने यांच्या
“खगोल अभ्यास कार्यशाळेचे आयोजन”

गोगटे जोगळेकर महविद्यालयात खगोल अभ्यास केंद्रामार्फत सहा दिवसांच्या खगोल अभ्यास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा दि. ६ डिसेंबर २०१६ ते दि. १२ डिसेंबर २०१६ या कालावधीत होणार असून कल्याण येथील नामवंत खगोल अभ्यासक प्रा. हेमंत मोने हे या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत.

या कार्यशाळेत अवकाशाची ओळख, खगोल अभ्यासाचे महत्व, अवकाशीय वस्तूंची गती, भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका, आपली सूर्यमाला, आकाश निरीक्षणासाठी पंचांगाचा वापर, दिवसाचा खगोल अभ्यास, दुर्बिणीची ओळख इ. विषयांची माहिती दिली जाणार आहे.

खगोल अभ्यासाची आवड असणारे कोणतीही व्यक्ती या कार्यशाळेत सहभागी होऊ शकेल. अअधिक माहिती व नाव नोंदणीसाठी खगोल अभ्यास केंद्र; द्वारा भौतिकशास्त्र विभाग, गोगटे जोगळेकर महविद्याल, रत्नागिरी येथे अथवा phygic@gmail.com, vivekvbhidestar@gmail.com या मेलवर अथवा ०९४२११३९२९६ (प्रा. विवेक भिडे), ०९७६४९३२६०४ (प्रा. आज्ञा शिरगावकर) या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा; असे आवाहन महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.
 
  • 2018 (71)
  • 2017 (184)
  • 2016 (37)