gogate-college

मुंबई विद्यापीठ ‘विद्यार्थी विकास नियोजन समिती’वर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. आनंद आंबेकर यांची नियुक्ती

Anand Ambekarमुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे युवा महोत्सव, अविष्कार संशोधन कार्यक्रम, विद्यार्थीनी सबलीकरण कक्ष, विद्यार्थी व्यावसायिक आणि शैक्षणिक मार्गदर्शन, उडान महोत्सव, विद्यार्थी संसद, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक युवा महोत्सव, परदेशी विद्यार्थी आदानप्रदान विकास कार्यक्रम इ. विद्यापीठ कार्यक्रमांची रूपरेषा ठरवणे, व्यवस्थापन करणे आणि वित्तीय नियोजन करणे यासाठी विद्यार्थी विकास नियोजन समिती काम करते. या समितीवर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. आनंद आंबेकर यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे.

या समितीच्या नुकत्याच झालेल्या सभेमद्धे स्थानिक पातळीवर रोजगार मार्गदर्शन आणि रोजगार संधींची उपलब्धता करून देण्यासाठी नवीन कार्यक्रमाला मंजुरी देण्यात आली. महिला स्वसंरक्षणासाठी एन.सी.सी.च्या स्वयंसेवकांनी इतर महाविद्यालयांतील विद्यार्थिनींचे प्रशिक्षण घ्यावे यासाठी विद्यार्थी विकास नियोजन समितीत निर्णय घेण्यासाठी प्रा. आंबेकर यांनी सहभाग घेतला. डॉ. विष्णू मगरे, प्र. कुलगुरू, मुंबई विद्यापीठ यांच्या अध्यक्षतेखाली सदर सभा झाली. या सभेला विद्यार्थी विकास कार्यक्रम संचालक डॉ. सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होते. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी नियुक्त केलेल्या या समितीमध्ये प्रा. आंबेकर हे रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव सभासद आहेत.

प्रा. आनंद आंबेकर हे गेली १० वर्षे रत्नागिरी जिल्हा सांस्कृतिक समन्वयक, ३ वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा सांस्कृतिक समन्वयक, १ वर्ष अविष्कार संशोधन कार्यक्रमाचे रत्नगिरी जिल्हा समन्वयक आणि गेली १० वर्षे विद्यार्थी कल्याण विभाग, मुंबई विद्यापीठ व्यस्थापन समितीचे सदस्य म्हणून काम करत आहेत.

प्रा. आंबेकर यांच्या नियुक्तीबद्दल त्यांना र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, आजीव सभासद मंडळाचे अध्यक्ष डॉ. मकरंद साखळकर आणि महाविद्यालयीन प्राध्यापक यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)