gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कु. कस्तुरी भागवत हिचे स्पर्धेत सुयश

मुंबई येथील गुरु नानक खालसा महाविद्यालय येथे नुकत्याच संपन्न झालेल्या गणित विषयाच्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या कु. कस्तुरी भास्कर भागवत हिने द्वितीय क्रमांकाचे परितोषिक पटकावले आहे. स्पर्धेत १० संघ सहभागी होते. तिने ‘फझी अॅन्ड स्टेटॅस्टीकल मेथड’ वापरून आंबा ग्रेडिंगसाठी मॅथॅमॅटिकल मॉडेल वापरून तयार केले आहे. ‘फझी अॅन्ड स्टेटॅस्टीकल मेथड फॉर मॅगो ग्रेडिंग` असे या मॉडेलचे नाव आहे. ही पद्धत वापरून आंबा ग्रेडिंगकरिता स्वयंचलित यंत्र तयार करण्याचे कामही सुरु आहे. या स्पर्धेत तिला प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेतील या यशाबद्दल गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे, गणित विभाग प्रमुख डॉ. राजीव सप्रे यांनी कु. कस्तुरी हिचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)