gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ६१व्या कालिदास व्याख्यानमालेत पुनरुत्थान विद्यापीठ, अहमदाबादच्या कुलगुरू मा. इंदुमती काटदरे यांची व्याख्याने

गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि संस्कृत विभाग यांच्यावतीने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या कालिदास व्याख्यानमालेत दि. २० व २१ फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी ५.०० वाजता राधाबाई शेट्ये सभागृहात यावर्षीची व्याख्याने संपन्न होत आहेत. व्याख्यानमालेचे हे ६१ वे वर्ष असून गेली ६० वर्षे या व्याख्यानमालेत अनेक नामवंत व्याख्यात्यांच्या व्याख्यानांचा लाभ रत्नागिरीतील संस्कृत प्रेमी नागरिकांनी आजवर घेतला आहे.

यावर्षी व्याख्यानमालेकरिता पुनरुत्थान विद्यापीठ, अहमदाबाद, गुजरातच्या कुलगुरू मा. इंदुमती काटदरे यांची ‘भारतीय शास्त्रांचे वर्तमानकाळातील उपयोग’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्याने होणार आहेत. त्या राष्ट्रीय पातळीवरील एक मोठी शैक्षणिक आस्थापना असलेल्या ‘विद्याभारती’ या संस्थेमद्धे १९८२ पासून कार्यरत आहेत. या संस्थेत अनेक मोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी पूर्ण केल्या आहेत. अहमदाबाद येथे स्वायत्त अशा पुनरुत्थान विद्यापीठाच्या त्या संस्थापक व कुलगुरू आहेत. भारत संस्कृती वाचनमालेमद्धे भारतीय संस्कृतीवर आधारित १०० लघुपुस्तकांचे लेखन आणि संपादन त्यांनी केले आहे.

या व्याख्यानमालेसाठी रत्नागिरीतील संस्कृत भाषेवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी आवश्य उपस्थित राहावे असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)