gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात संशोधन विषयक कार्यशाळा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात विद्यार्थी संशोधन विभागांतर्गत विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळावी म्हणून “शोध वेध व अविष्कार मार्गदर्शन कार्यशाळा” नुकतीच घेण्यात आली. संशोधन क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी यापूर्वी ‘अविष्कार’ या आंतरविद्यापीठिय स्तरावरील संशोधन स्पर्धेत नैपुण्यपूर्ण अशी कामगिरी केली आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी संशोधन विभागांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी, विद्यार्थ्यांच्या अंगी सलेल्या संशोधनवृत्तीला गतिमान केल्यास भविष्यात उत्तम शास्त्रज्ञ निर्माण होतील. यासारख्या उपक्रमांतून समाज घडविणारे संधोधक निर्मान व्हावेत ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती वृद्धिंगत व्हावी म्हणून महाविद्यालयीन स्तरावर ‘शोधवेध’ ही स्पर्धा २००६ या वर्षापासून यशस्वीपणे घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी संशोधनाची गरज आणि त्यांचे उपयोगिता मूल्य तपासून पाहावे. तसेच आंतरविद्याशाखीय संशोधनावर अधिक भर देऊन सर्वोत्तम आणि दर्जेदार असे संशोधन प्रकल्प तयार करून महाविद्यालयाचे नाव उज्जवल करावे; असे उपस्थितांना आवाहन केले.

विज्ञान शाखेकरिता डॉ. राजीव सप्रे यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन करताना कल्पकता, व्यक्तिमत्व विकास, संप्रेषण कौशल्य, संशोधनातील सहभाग याविषयी सखोल माहिती दिली. वाणिज्य शाखेकरिता प्रा. रुपेश सावंत यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन करताना संशोधनाची उद्दिष्टये, गृहीतके निश्चिती, तक्ते कसे तयार करावे याविषयी विस्तृत अशी माहिती दिली. कला शाखेकरिता डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी मार्गदर्शन करताना संशोधन विषय निवड, नमुना निवड, विश्लेषण तंत्र आणि सादरीकरण याबाबत माहिती दिली.

कार्यशाळेचे स्वागत आणि प्रास्ताविक ‘शोधवेध-अविष्कार समिती’चे समन्वयक डॉ. मकरंद साखळकर यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. डी. एस. कांबळे यांनी केले. सदर कार्याशाळेकरिता कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील ३२१ विद्यार्थ्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदविला.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)